आश्रमशाळेत शिकलेली शबाना होणार डॉक्टर, मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले कौतूक
गगन भरारी चे ध्येय ठेवणाऱ्या अनाथ पाखरांच्या पंखांत अनाथ आरक्षणामुळे उडण्याचं बळ येत आहे, माझ्यासाठी ही अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब असून अनाथ आरक्षणामुळे भविष्याची सोनेरी स्वप्ने अशीच विद्यार्थ्यांची पूर्ण होत जावो असे उदगार राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज मुंबईत काढले. निमित्त होतं शबाना शेख या विद्यार्थीनीने भेट घेतल्याचं. अनाथ शबाना एक टक्का आरक्षणामुळे औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे.
मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या परिसरात चार वर्षाची एक मुलगी अनाथ अवस्थेत भटकताना श्री के के देवराज यांना सापडली. देवराज यांनी या मुलीला बदलापूर येथील संगोपन संस्थेत आणून सोडले. लहानपणापासूनच शबाना अत्यंत धाडसी आणि कष्टाळू होती. तिला शिक्षणाची आवड होती संगोपन संस्थेत राहूनही ती आपला अभ्यास नियमीतपणे करत होते बदलापूर येथील आईएएस कात्रज विद्यालयात तिने दहावीची परीक्षा 73 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण केली. बारावी विज्ञान शाखेतून 60 टक्के गुण प्राप्त केले तर नीट परीक्षा 307 गुणांनी उत्तीर्ण केली मात्र एम बी बी एस प्रवेशासाठी हे पुरेसे नव्हते तिला खरी मदत झाली ती अनाथ आरक्षणाच्या एक टक्क्याची. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे त्यापैकी शबाना शेख ही आणखी एक विद्यार्थिनी तिला औरंगाबादच्या घाटी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस साठी प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळाल्यानंतर तिने आभार व्यक्त करण्यासाठी आज एडवोकेट ठाकूर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकूर यांनी तिचे कौतुक करीत या भावी आयुष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.Shabana will be a doctor due to orphan reservation