प्रेम प्रकरणात स्वेच्छेने ठेवलेले शरीर संबंध बलात्कार ठरत नाही, कोर्टाचा मोठा निर्णय

प्रेम, सेक्स, ब्रेकअप हे आताच्या तरूण तरूणींचं सामान्य आयुष्य झालं आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणात ठेवलेले शरीरसंबंध ब्रेकअप नंतर बलात्कार ठरत नाही असा निर्णय जयपूर उच्च न्यायालयाने दिला आहे.;

Update: 2022-02-26 14:57 GMT


प्रेम प्रकरणातून शरीरसंबंध ठेवला असता तो ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असा महत्वपुर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायलयाने दिला आहे. राधाकृष्ण मीना विरुध्द राजस्थान राज्य सरकार या खटल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठात सुनावणी सुरु होती.

उच्च न्यायालयाने फिर्यादीच्या व्हॉटस्अॅप संदेशासह नमुद केलेल्या बाबींवर संशय व्यक्त केला. तसेच मुलगा आणि मुलगी यांच्या नात्यात ब्रेकअप सामान्य प्रकार आहे. तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारिरीक संबंध ठेवल्याचे फिर्यादीने म्हटले होते. त्यावर न्यायालयाने म्हटले की, फिर्यादी एक सुशिक्षित महिला आहे. तिला शारिरीक संबंधाचे परिणाम माहिती होते. तसेच आरोपी आणि फिर्यादी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तर त्यातूनच त्यांनी शारिरीक संबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात बलात्कार प्रकरणातील आरोप रद्द करण्यात आला.

आरोपीने शारिरीक संबंधाचे व्हिडीओ काढून धमकी दिली असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. मात्र न्यायालयातील युक्तीवादात आणि एफआयआरमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे मात्र तक्रारदार आणि सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला की एफआयआर रद्द करताना पुराव्यांची महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आढळून आले नाही, असे निरीक्षण न्यायमुर्ती फर्जद अली यांनी दिला आहे.

न्यायमूर्ती अली म्हणाले की, 2018 मध्ये दिलेले वचन दोन वर्षांनंतर पाळण्यात अपयश आले. याचा अर्थ ते वचन खोटे आहे आहे असा काढता येणार नाही. तसेच गैरसमजातून शरीरसंबंधास परवानगी दिल्याची सबबही योग्य नाही. त्यामुळे परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवणे हा ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असा महत्वपुर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.

Tags:    

Similar News