दुष्काळी येवला तालुक्यात यंदा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत असून सद्यस्थितीला तब्बल 13 गावे दोन वाड्याची तहान 7 टँकरद्वारे अठरा खेपाद्वारे रोज भागवली जात असून तहान १४ वाड्या व २ गावांचे टँकरचे प्रस्ताव अजून प्रलंबित असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.
येवला तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टँकरची मागणी असते जानेवारीपासूनच टँकरची मागणी होत असते मात्र या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी आली असल्याप्रमाणे आजच्या घडीला 13 गावे व दोन वाड्या अशा 15 गावांसाठी सात टँकरद्वारे 18 खेपा करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
भुलेगाव येथे पाण्याचे टँकर येते मात्र ते अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याने प्रत्येक जण या ठिकाणी पाण्याचा टाके लावत असल्याने काहींना पाणी मिळते तर काहींना कमी मिळते त्यामुळे अजुन पाणी मिळावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे. महिलांना कामावर जावे लागत असल्यामुळे त्यांच्या मुलांना पाणी आणण्याची वेळ येत असल्याने अजून जास्त प्रमाणात पाणी मिळावे अशी मागणी देखील येथील महिलांनी केली आहे