बिहारमधून १६ वर्षांच्या मुलीचं केलं होतं अपहरण, मग काय मुलीची महाराष्ट्रात झाली सुटका

Update: 2022-05-25 02:32 GMT

वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर एक प्रवाशी रेल्वे थांबली आणि अचानक एक प्रवाश्याने उतरून स्थानकावरील रेल्वे पोलिसाला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेत जातं मुलीला ताब्यात घेतले.बिहार राज्यातील पूर्णिया गावातील अवघ्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन रेल्वेगाडीने घेऊन जात असलेल्या आरोपींची सेवाग्राम रेल्वेस्थानकावरील आरपीएफच्या जवानांनी धरपकड केली असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीसह दोन्ही आरोपींना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा आरपीएफ उपनिरीक्षक विनोद मोरे,सेवाग्राम आरपीएफ उपनिरीक्षक अनिल कुमार शर्मा,अरक्षक तसेच चाईल्ड लाईन अधिकाऱ्यांनी योग्य कामगिरी बजावली.

Tags:    

Similar News