सहव्याधी असणाऱ्या नागरीकांचा ओमिक्रॉनमुळे मृत्य़ू होऊ शकतो...
तज्ज्ञांच्या मतानुसार ओमिक्रॉन हा विषाणूची लक्षणे सौम्य असली तरी त्याच्या प्रसाराचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे गंभीर आजार आणि सहव्याधी असणाऱ्या नागरीकांचा ओमिक्रॉनमुळे मृत्य़ू होऊ शकतो, असे मत राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे.;
कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरूवात झाली असतानाच अचानक दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव समोर आला. त्यानंतर जगभर ओमिक्रॉनच्या रूग्ण आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार ओमिक्रॉन हा विषाणूची लक्षणे सौम्य असली तरी त्याच्या प्रसाराचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे गंभीर आजार आणि सहव्याधी असणाऱ्या नागरीकांचा ओमिक्रॉनमुळे मृत्य़ू होऊ शकतो, असे मत राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे.
तर ओमिक्रॉन या विषाणूला रोखण्यासाठी राज्यात वॉररूम तयार करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
मार्च 2020 ते डिसेंबर 2021 या काळात राज्यात आलेल्या दोन्ही कोरोना लाटेत 66 लाख 50 हजार 140 रूग्णांची नोंद झाली. तर त्यापैकी 1 लाख 41 हजार 496 रूग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.परंतू आता राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला आहे.
राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती-
गेल्या काही दिवसांपुर्वी मंदावलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3 हजार 900 कोरोना रूग्णांची वाढ तर 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 0.22 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे अहमदनगर, नागपुर, नाशिक, पालघर, रायगड आणि सातारा जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर भंडारा, वाशिम, हिंगोली, धुळे, चंद्रपुर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जि्ल्ह्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांचीसंख्या सर्वात कमी आहे.
राज्यातील ओमिक्रॉनची सद्यस्थिती-
देशातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 961 वर पोहचली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 252 ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत. तर यातील 99 रूग्ण ओमिक्रॉनमुक्त झालेले आहेत. मात्र गेल्या 24 तासात राज्यात 85 ओमिक्रॉन रूग्णांची वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले की, युरोप आणि अमेरीकेत डेल्टा आणि ओमिक्रॉनमुळे त्सुनामी आली आहे. त्यात भारताला मोठा धोका आहे. त्यामुळे ही वाढती रुग्णसंख्या हा आपल्या देशासाठी इशारा आहे. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घ्यायला हवी.
तर ओमिक्रॉनचा संसर्ग सौम्य असल्याचे म्हटले जात होते. मात्र पाश्चिमात्य देशांमधून येत असलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन संसर्गामुळे रूग्णांचा मृत्यू होत आहे.
त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धिंडवडे निघालेली राज्याची आरोग्य यंत्रणा ऑ्क्सिजन आणइ बेडसची संख्या याबाबत सज्ज आहे का?
राज्यात ऑक्सिजनची सद्यस्थिती काय आहे?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामध्ये अनेक रू्ग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. मात्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून धडा घेत ऑक्सिजन प्लाँटची उभारणी केली. तर राज्याला ऑक्सिजन निर्मीतीच्या बाबतीत राज्याला स्वयंपूर्ण करणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 569 ऑक्सिजन प्लाँटच्या माध्यमातून 601 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मीतीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तर 366 ऑक्सिजन प्लाँटचे काम पुर्ण केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तर या प्लाँटच्या माध्यमातून 379 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मीती होणार आहे, असा दावा आरोग्यविभागाने केला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका शहरी भागाला सर्वाधिक तर दुसऱ्या लाटेचा शहरी आणि ग्रामिण भागाला फटका बसला होता. त्यावेळी अनेक रूग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने झाला होता, असे मत अभय शुक्ला यांनी व्यक्त केले. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर चंद्रपुर आणि गडचिरोलीत एकही ऑक्सिजन प्लाँट पुर्ण झाला नाही तर बीड, चंद्रपुर, गोंदिया, जालना, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग आणि वर्धा जिल्ह्यात अपुर्ण प्रकल्पांची संख्या जास्त आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ओमिक्रॉन रूग्णवाढीच्या पार्श्वभुमीवर 500 मेट्रीक टन ऑक्सिजन लागला तरच लॉकडाऊन करण्यात येईल. तर सध्या ऑक्सिजनची गरज ही 125 मेट्रीक टनच्या आसपास आहे. ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये म्हणून मेडिकल लिक्विड ऑक्सिजन प्लाँट उभारण्यात येणार आहेत.
राज्यात बेडची काय स्थिती-
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांना बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर बेडची संख्या वाढवत नेली. मात्र तरीही दुसऱ्या लाटेत बेड न मिळाल्याने अनेक रूग्ण मृत्यूमुखी पडले.परंतू दुसऱ्या लाटेचा अनुभव गाठीशी असताना ओमिक्रॉन वेगाने पसरत असल्याने रूग्णसंख्या वाढली तर बेडस् उपलब्ध आहेत का? याविषयी माहिती-
राज्य सरकारच्या आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 55 हजार ऑक्सिजन बेडस् आहेत. तर ICU बेड्स ची संख्या 21 हजार 619 आणि व्हेंटीलेटर्सची संख्या 10 हजारापेक्षा जास्त आहेत.
पहिल्या लाटेत वृध्द व सहव्याधी असणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला होता. तर दुसऱ्या लाटेत युवकांना कोरोनाने वेढले होते. त्यामुळे तिसरी लाट आली तर ती लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर सरकारने लहान मुलांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्स बेड तयार केले आहेत.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 52 लहान मुलांची रूग्णालये आहेत.तर संशयीत असलेल्या लहान मुलांसाठी 6 हजार बेडची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच लहान मुलांसाठी 5 हजार 136 ऑक्सिजन बेड, २ हजार965 आयसीयु बेडस् आणि 977 बेड्स राधून ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबरच लहान मुलांना व्हेंटीलेटरची गरज पडल्यास त्यांना 1 हजार 390 व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्यातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये 76 हजार ऑक्सिजन आणइ 16 हजार आयसीयु बेड आहेत.
राज्यात लसीकरणाची स्थिती काय आहे?
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे. आतापर्यंत 13 कोटी 31 लाख 31 हजार 812 नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.तर बुधवारी 4 लाख 20 हजार 515 नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी 87 हजार 215 नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर 3 लाख 33 हजार 315 नागरीकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. ( स्रोत- https://dashboard.cowin.gov.in/ )
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, वाढत्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत व सुरक्षित रहावे.
याच पार्श्वभुमीवर लहान मुलांसाठी कोवोवॅक्स आणि कार्बोवॅक्स या लशींना मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात साडेपाच कोटी नागरीकांना दुसरा डोस मिळाला आहे. तर लहान मुलांसाठी असलेली कोवोवॅक्स लस शाळेत जाऊन देता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. तर कोणता बुस्टर द्यायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तर कोणत्या लसीचा बुस्टर डोस द्यायचा याची वाट पाहत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
मात्र निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येतील.
औषधांचे नियोजन-
कोरोनाची पहिली लाट सुरू असताना कोणती औषधे कोरोनाला नियंत्रित करू शकतील, याची पुरेपुर माहिती आरोग्य यंत्रणेलाही नव्हती. मात्र दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर रेमडेसिवीर, टॉसिलिझुमॅबसारखी औषधे उपलब्ध झाले होते.मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांसाठी अवाजवी किंमत आकारून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आले होते. त्यावर राज्य सरकारकडून औषधांचा काळाबाजार करणारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आरोग्य यंत्रणेने औषधांचा काळाबाजार रोखायला हवा.
कोरोना काळात अवाजवी बीले-
डॉ. अभय शुल्का यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांकडून कोरोना उपचाराचे अवाजवी शुल्क आकारण्यात आले होते.