मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये आज दुपारी १२.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
किशोर नांदलस्कर यांनी आतापर्यंत ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. किशोर नांदलस्कर यांच्या रंगभूमीच्या कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर 'नाना करते प्यार' हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव' सिनेमातून नांदलस्कर यांचं बॉलिवूडमध्ये पर्दापण झालं होते. जिस देश में गंगा रहता है, तेरा मेरा साथ, खाकी, हलचल, सिंघम या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
किशोर नांदलस्कर यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं असा परिवार आहे. किशोर नांदलस्कर यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.