Seema Deo Passed Away:ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे.त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अल्झायमर या आजाराशी झुंज करत होत्या. रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं
सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती . त्यासह त्यांनी ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’,‘सुवासिनी’,‘सोनियाची पावले’,‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’. या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला. अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाची कला दाखवली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
https://youtube.com/shorts/98ORWr-WfNY?si=X-bQ0Ihd9jm4U2S3