काँग्रेस नेते राहुल गांधी परदेश दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नेपाळमधील एका पबचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये राहुल गांधी हे एका चिनी महिलेसोबत दिसत आहे. ही महिला नेपाळमधील चीनची राजदूत हौ यानकी असल्याचं म्हंटल जात आहे.
नेपाळमधील चीनच्या या राजदूत हौ यांकी कोण आहेत? हे जाणून घेण्यापूर्वी आपण राहुल गांधींच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय आहे पाहुयात...
नेपाळमधील एका पबमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेपाळचा हा प्रसिद्ध पब LOD-लॉर्ड ऑफ ड्रिंक्स असल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधी यांच्यासोबत असलेली महिला नेपाळमधील चीनची राजदूत हौ यानकी असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओ काठमांडू येथील रहिवासी भूपेन कुंवर यांनी 2-3 मे 2022 च्या रात्री फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांच्या फोनमध्ये व्यस्त आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एका मुलीसोबत उभे आहेत आणि तिच्या कानात काहीतरी बोलत आहे.
या व्हिडिओवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी नेपाळमध्ये एका मित्राच्या लग्नाला गेले होते, त्यांचा एक पत्रकार मित्र आहे त्याच्या लग्नासाठी ते गेले आल्याच त्यांनी म्हंटल आहे.
नेपाळ मधील कोणत्या मित्राच्या लग्नाला राहुल गांधी गेले होते..
नेपाळच्या काठमांडू पोस्ट या वेबसाईटनेही राहुल गांधींच्या भेटीचे वृत्त दिले आहे. 2 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, राहुल गांधी त्यांच्या मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळमध्ये आले आहेत. सुमनिमा उदास ज्या CNN च्या माजी वार्ताहर आहेत त्यांचा नीमा मार्टिन शेर्पा यांच्याशी मंगळवारी विवाह झाला आणि रिसेप्शन 5 मे रोजी होणार आल्याच वृतांत म्हंटल आहे. त्यासाठी राहुल गांधी नेपाळला गेले होते.
नेपाळमधील चीनच्या या राजदूत हौ यांकी कोण आहेत?
Hou Yankee या 2018 पासून त्या नेपाळमध्ये चीनच्या राजदूत आहेत. यँकी यांनी दीर्घकाळ परराष्ट्र मंत्रालयात उपसंचालक म्हणूनही भूमिका बजावली आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले,
यांकी या १९९८ ते २००१ या काळात चीनचे राजदूत म्हणून त्यांनी पाकिस्तानात देखील काम केले आहे.
राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या महिला दिसत आहे त्या Hou Yankee असल्याचा दावा केला जात आहे. मात्र नक्की या व्हिडिओमध्ये त्याच आहेत का याबाबत कुठलीही सत्यता अद्याप समोर आलेली नाही.