मरणाच्या दारातून परत येणं म्हणजे काय असतं पहा...

Update: 2023-07-23 13:20 GMT

सध्या महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरीसह रायगड जिल्ह्याला ओरेंज अलर्ट देण्यात आलं होत. रत्नागिरी जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. रात्नागिरी जिल्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. त्यातच आता एका व्यक्तीने पुराच्या पाण्यात झाडाच्या फांदीवर बसून अख्खी रात्र जागून काढल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली चिंचघर भारजा नदीला आलेल्या पुरात महेंद्र पत्रत नामक व्यक्ती गुरुवारी रात्री वाहुन गेली होती. नदीला खूप मोठा प्रवाह असताना सुदैवाने त्याच्या हाताला फांदी सापडली आणि त्याच फांदीच्या जोरावर ते झाडावर चडले. मृत्यु डोळ्यासमोर दिसत असतानाही न खचता अख्खी रात्र त्यांनी झाडावर बसून काढली. या नदीत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्याही परिस्थितीत त्यांनी झाडाचा आसरा घेत आपले प्राण वाचवले. सकाळी गावातील लोकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढला.

Tags:    

Similar News