School Reopen In Rajasthan :राजस्थानमध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था उघडणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Update: 2021-07-23 06:23 GMT

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संगणक शिक्षकांची नियमित भरती करणे आणि दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्ह 2 ऑगस्टपासून उघडण्याचा (School Reopen In Rajasthan) निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजस्थानमधील शाळेचा घंटा पुन्ह एकदा वाजणार आहे.

बैठकीनंतर शिक्षणमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरोना कालावधीत बंद करण्यात आलेल्या शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 2 ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती डोटासरा यांनी दिली.

पुढे बोलताना डोटासरा म्हणाले की, सद्या शाळा आणि महाविद्यालय उघडण्याची तारीख जाहीर केली असून, कोचिंग क्लासेस कधीपासून सुरु करायचे याची तारीख नंतर जाहीर करणार आहे. शाळा आणि महविद्यालये सुरु करण्याबाबत (School Reopen In Rajasthan) मंत्रिमंडळ बैठकीत विस्तारपणें चर्चा करण्यात आली असून, एक्सपर्ट यांच्यासोबत चर्चा सुद्धा करण्यात आल्याचं डोटासरा म्हणाले.

Tags:    

Similar News