ADOBE मार्फत महिलांसाठी शिष्यवृत्तीची संधी...

ऑगस्टच्या या तारखेपर्यंत अर्ज करता येणार...;

Update: 2021-08-17 04:15 GMT

एडोब इंडिया वूमन इन टेक्नॉलॉजी या स्कॉलरशिपसाठी आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. हा अर्ज रविवारी 22 ऑगस्ट 2021 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करता येणार आहे. एडोब इंडिया ही एक जागतिक दर्जाचे अत्याधुनिक शैक्षणिक संशोधनाववर काम करणारी संस्था असून या माध्यमातून नाविन्यपूर्ण संशोधनास प्रोत्साहन दसण्याचे काम केले जाते. या क्षेत्रात मुलींनी देखील पुढे यावे म्हणून या संस्थेमार्फत दरवर्षी एडोब इंडिया वूमन इन टेक्नॉलॉजी ही स्कॉलरशिप दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ज्या मुलींचे विद्यापीतील शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संपणार आहे आशा मुलींना शिक्षण शुल्क निधी मिळणार असून, ADOBE च्या एका वरिष्ठ तंत्रज्ञान तज्ञांकडून मार्गदर्शनाची संधी देखील मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रेस हायपर कॉन्फरन्स इंडियाचा प्रवास करायची संधी या माध्यमातून मिळू शकते.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी काय निकष आहेत?

ज्या महिलांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहे त्यांना बीई/ बी/बीटेक किंवा इंटिग्रेटेड एमई / एसएस / एमटेक प्रोग्राम मध्ये भारतीय विद्यापीठात किंवा संस्थेत पूर्णवेळ विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे.

ज्या विद्यार्थिनींचे चालू असलेले शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संपेल अशाच मुली यासाठी अर्ज करू शकतात.

यासह कम्प्युटर सायन्स, इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन सायन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, गणित आणि संगणकीय या शाखांच्या विद्यार्थिनी सुद्धा या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.

यामध्ये ADOBE संस्थेचा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या संबंधितांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. या शिष्यवृत्तीसाठी फक्त भारतीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या विषयीची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्द आहे.

Tags:    

Similar News