सहीष्णा सोमवंशीने वयाच्या १८ व्या वर्षी पूर्ण केला "व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग' कोर्स..

Update: 2022-01-27 13:35 GMT

इंडियन मिनिस्ट्री अॉफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्स मधील '' व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग'' हा कोर्स करणारी भारतात सर्वात कमी वयाची पाचोर्यातील सहीष्णा सोमवंशी ही पहीली मुलगी ठरली आहे.

भारताच्या डीरांग अरुणाचल प्रदेश आणि आसाम च्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या ठिकाणी भारतातुन विविध राज्यांतील महीला आणि पुरुष अकरा दिवसाचा कॅम्प करण्यासाठी जातात. यात आपत्कालीन परिस्थिती काशी हाताळावी यासाठी भारतीय लोक सक्षम असावे म्हणून हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री अॉफ डेफेन्स द्वारे आयोजित केला जातो. माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडींग, बायक रायडिंग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग असे कोर्स आयोजित केले जातात. ज्या ठिकाणी या कोर्सचे आयोजन केले जाते त्या ठिकाणी शुन्य तापमान असुन आशा खडतर वातावरणात हा कोर्स पुर्ण करावा लागतो.

सैन्या प्रमाणे जेवण घेणे अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करणे आशा अनेक टास्क या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतात. परदेशात अशा कोर्सला खुपच महत्व दिले जाते. व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षक कडुन हे सर्व कोर्स शिकवले जातात. हा कोर्स खडतर असल्या कारणाने या कोर्ससाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे या कोर्स मुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो येणाऱ्या काळात ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना मी मार्गदर्शन करेल असे हा कोर्स पूर्ण करून परतल्यानंतर सहीष्णा सोमवंशीने सांगितले. असे कोर्स केल्यास येणाऱ्या काळात विद्यार्थी, युवक-युवती मधील आत्मविश्वास वाढेल आणि चांगली भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल अशी आशा सहीष्णा ने व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News