शरद पवार या वटवृक्षाच्या सावलीत स्थिरावणार - रुपाली ठोंबरे

Update: 2021-12-16 05:44 GMT

पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल पत्रकार परिषद घेत मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता त्या कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आज त्यांनी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश करणार असल्याचं सूचक ट्विट केलं आहे. ' आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय' दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार ...' असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याचे म्हंटले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर नुकतंच त्यांनी फेसबुकवरून मनसेला जय महाराष्ट्र केल्याचं सांगितलं. मनसे नेेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर जोरदार आरोप केले.

रुपाली पाटील ठोंबरे मनसेचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात होती. त्या शिवसेनेत जातील असं देखील म्हंटल जात होतं. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांतील भूमिका पाहता त्या राष्ट्रवादीत जातील, असं काही जाणकारांचं म्हणणं होतं. मात्र त्यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केलेलं नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीत स्थिरावणार आल्याच त्यांनी म्हंटल आहे. पण महाविकास आघाडी हे तीन पक्ष्यांचं सरकार आहे त्यामुळे रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी, काँग्रेस मध्ये जाणार की त्या हातात शिवबंधन बांधणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags:    

Similar News