सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे राज्याचं राजकारण चांगलेच तापले आहे. या सगळ्या सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तुमच्यापेक्षा मी किती वरचढ आहे हे दाखवण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. राज्यात जरी या सगळ्या घटना घडत असल्या तरी समाज माध्यमांवर व प्रसार माध्यमांवर सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल की इतकं सगळं होत असताना दुसऱ्या कुठल्या गोष्टीची चर्चा सुरू असणार.. तर ती गोष्ट आहे रुपाली ठोंबरे-पाटील यांनी महाविकास आघाडीकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत दिलेल्या गिफ्टची.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना साबण, ब्रश, तेलाची बाटली आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसलं गिफ्ट? तर यावर रुपाली पाटील काय म्हणाल्या आहेत तेही वाचा..
चंद्रकांत दादा पाटील यांनी मागे बोलताना राज्यात कुठेही निवडणूक लावा मी जर निवडून आलो नाही तर हिमालयात जाईल असं विधान केलं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांनी, त्यांनी ज्या प्रमाणे म्हटलं होतं तो शब्द पळाला नाही. व त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयात जायला हवं होतं. मात्र ते गेले नाहीत असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी चंद्रकांतदादा यांना पुन्हा एकदा त्यांच्या त्या विधानावरून टोला लगावला आहे.
त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा रूपाली ठोंबरे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्या अशा विधानांमुळेच राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले जात आहे म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट हे आम्ही त्यांना कुरियरने पाठवत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.