आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2024 च्या मानकरी रुपाली गांगुली आणि हिना खान
या पुरस्कार वितरण सोहळ्यात 'अनुपमा' मालिकेतील अप्रतिम भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या रुपाली गांगुली आणि फॅशनच्या क्षेत्रात आपली छाप उमटवणारी हिना खान यांनी विजेत्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले. त्यांच्यासह अनेक कलाकारांनी पुरस्कार मिळवून सर्वांचे लक्ष वेधले.;
मुंबई: गुरुवारी झालेल्या आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2024 मध्ये बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील चमकदार चेहरे झळकले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात 'अनुपमा' मालिकेतील अप्रतिम भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या रुपाली गांगुली आणि फॅशनच्या क्षेत्रात आपली छाप उमटवणारी हिना खान यांनी विजेत्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले. त्यांच्यासह अनेक कलाकारांनी पुरस्कार मिळवून सर्वांचे लक्ष वेधले.
रुपाली गांगुली: सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री
'अनुपमा' मालिकेतील अशक्य वाटणाऱ्या प्रवासाचे उत्कृष्ट चित्रण केल्याबद्दल रुपाली गांगुली यांना 'सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री'चा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेमुळे रुपाली घराघरात पोहोचली असून, तिच्या अभिनयाचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे. पुरस्कार स्वीकारताना रुपाली म्हणाली, "हा पुरस्कार मिळवून खूप आनंद झाला आहे. यासोबतच जबाबदारीही वाढली आहे. चाहत्यांच्या प्रेमानेच हा सन्मान मिळाला आहे."
हिना खान: पाथभेदक व्यक्तिमत्व पुरस्कार फॅशनच्या क्षेत्रात नेहमी वेगळे काही करून दाखवणाऱ्या हिना खान यांना 'पाथभेदक व्यक्तिमत्व' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्या बोल्ड स्टेटमेंट्स आणि नवीन धाटणीचा फॅशनमध्ये सतत वापर केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना हिना म्हणाली, "असा वेगळेपण स्वीकारले जाणे आणि सन्मान मिळवणे याचा खूप आनंद होतो. हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे." असं मत हिना खान यांनी व्यक्त केल.
या पुरस्कार सोहळ्यात इतर अनेक कलाकारांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव प्रदान करण्यात आला. मोहित मलिक यांना सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता, अवनीश तिवारी यांना सर्वोत्कृष्ट वेब अभिनेता, अदिती राही जानी यांना सर्वोत्कृष्ट व्हीजे असे विविध पुरस्कार जाहीर झाले.
रेड कार्पेटवरील ग्लॅमर
कार्तिक आर्यन, सुष्मिता सेन, राखी सावंत, सोनू सूद यांसारख्या कलाकारांनी रेड कार्पेटवर आपल्या वेगळ्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. हा कार्यक्रम मनोरंजक सादरीकरण आणि कलाकारांच्या दमदार परफॉरमनन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता.
आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2024 चा हा सोहळा कलाकारांचा गौरव करण्यासोबतच मनोरंजन क्षेत्रातील नवीन प्रतिभांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो. या सोहळ्यानं कला आणि मनोरंजनचा खराखुरा अनुभव प्रेक्षकांना दिला.