नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटील यांच्या या व्हिडिओ संदर्भात सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचं काम करत आहेत. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनातील व्हिडिओ व्हायरल करणे हा गुन्हा आहे. महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना सध्या घडत आहेत राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे आणि गौतमी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
या वेळी त्यांनी खालील मुद्दे देखील उपस्थित केले..
मुली आणि महिला हरवण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे..
मुली आणि महिला हरवण्याचे प्रमाण जास्त वाढत असल्याने राज्यांमधील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या मिसिंग सेल सक्षम करण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी अधिकारी वाढवल्यास हरवलेल्या मुली मुलांचे आणि महिलांच्या सोर येण्यास प्रशासनाला मदत होणार आहे आणि सर्वच ठिकाणी कार्यरत असतात याबाबत आता जनतेला माहिती देण्याचं काम ही सध्या महिलांच्या वतीने करण्यात येत असल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
महिलांच्या तक्रारी स्थानिक स्तरावर सोडवल्या गेल्यास नागरिकांचेही समाधान होईल..
-प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक तहसीलदार आणि प्रशासनातील विविध अधिकारी कार्यरत असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले तर महिला आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जन सुनावणी मध्ये गर्दी दिसणार नाही. महिलांच्या तक्रारी स्थानिक स्तरावर सोडवल्या गेल्यास नागरिकांचेही समाधान होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.