चला मुलांनो चला शाळेचा पहिला दिवस...

आशेची बघ पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्न आले...शाळेकडे परत फिरूया चला मुलांनो चला शाळेचा पहिला दिवस....

Update: 2021-10-04 03:19 GMT

कोरोना महामारीमुळे मागच्या दीड वर्षांपासून सर्वत्रच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता हळूहळू महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत. त्यासंबंधी राज्य सरकारने नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे.

आज शाळा सुरू होणार या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल एक व्हिडीओ ट्विट केला आहे. आशेची बघ पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्न आले, डोळ्यांमध्ये फुलपाखरे, ओठांवरती गोड गुपिते घेऊन आता चला...कट्टीबट्टी गप्पा गोष्टी, पुस्तकांशी जुनीच गट्टी,पुन्हा करूया चला...शाळेकडे परत फिरूया #चलामुलांनोचला... #शाळेचापहिलादिवस #BackToSchool ... दीड वर्षानंतर पुन्हा शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे मुलांनी पुन्हा शाळेकडे चला. शाळेचा पहिला दिवस शाळेकडे परत फिरू यात, चला मुलांनो चला असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Tags:    

Similar News