चिपळूण पूरग्रस्तांच्या घराघरात पोहचून 'जिजाऊ'चं मदतकार्य..

Update: 2021-08-05 10:59 GMT

राज्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि याचा फटका अनेक गावांना बसला आहे. त्यामुळे आशा पूरग्रस्त भागांसाठी राज्यभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. तर राज्यात आलेले संकट हे आपल्यावर आलेले संकट आहे आणि ते दूर करण्यासाठी अनेक संस्था सुद्धा पुढाकार घेत आहे. यापैकी एक म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे. चिपळूण येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सलग सात दिवस जिजाऊ संस्थेकडून मदत करण्यात आली.

निसर्गाच्या प्रकोपणे कोकणातील अनेक भागात दिनांक २१ जुलै रोजी महापूर आला. या महापुराची तीव्रता एवढी भयानक होती की, अनेक गावांमध्ये २० फुटाहुन अधिक पाणी भरले अनेक गावांतील जवळ जवळ सर्व घरे पाण्याखाली बुडाली. तसेच चिपळूण, महाड सारखी कोकणातील दोन मुख्य बाजारपेठा असलेली शहरे पाण्याखाली गेली त्यामध्ये व्यापारी वर्ग, स्थानिक नागरिकांचे खूप नुकसान झाले.

तर महाड तालुक्यातील तलीये गावांवर डोंगर कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली त्यामध्यें असंख्य समाजबाधवांचा प्राण गेला. कोकणावर आलेले हे संकट इतकं भयानक होत की, अनेक पूरग्रस्त भागांमध्ये अनेक दिवस घरांमध्ये गाळ भरल्याने, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने, अन्नधान्याचे नुकसान झाल्यानें उपासमारीची वेळ पूरग्रस्तांच्यावर आली.


अशावेळी कोकणावर आलेले संकटात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी चिपळूण वासीय जनतेच्या सेवेसाठी २० जणांची स्वयंसेवकांची टीम, ४ रुग्णवाहिका, ५ हजार अन्नधान्य किट, १० हजार ब्लॅंकेट, ५ हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, य वस्तूचे वाटप जवळपास ७ दिवस पूरग्रस्त भागांतील घराघरात जाऊन केले.

कोकण वासीय जनतेवर आलेले संकट हे फक्त कोकणातील जनतेवर आलेले संकट नसून कोकण हे जिजाऊचं कुटूंब आहे आणि हे संकट सोडवणे हे जिजाऊचं आद्य कर्तव्य आहे. कोकणातील पूरग्रस्तांच्या सोबत संपूर्ण जिजाऊ परिवार खंबीरपणे उभे असून सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य शेत्रात शक्य होईल तेवढी मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू, असे संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे म्हणाले.

Tags:    

Similar News