परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून पडत असलेला सततचा पाऊस व अनेक वेळा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील बाभळगांव मंडळ हे अधिक प्रभावित झाले. काढणीसाठी आलेले सोयाबीन हे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. या भागात दिवस रात्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरू असल्याने शेतीत कोणत्याही प्रकारची कामे करता येत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. काढणीचे पीक पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.