रश्मी करंदीकर यांची समयसुचकता, वाचवले तरुणांचे प्राण...
रश्मी करंदीकर यांच्या समयसुचकतेने वाचले धुळ्याच्या तरुणाचे प्राण, वाचा कसे हलले सूत्र...
मुंबई पोलिस उपायुक्त (सायबर विभाग) रश्मी करंदीकर नेहमीच त्यांच्या धडाकेबाज कारवाई, आणि समयसुचकतेसाठी ओळखल्या जातात. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. धुळ्याचा एक युवक फेसबूक लाईव्ह करून आत्महत्या करत असल्याची बाब आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ मुंबई पोलिस सायबर विभागाशी संपर्क केला. रश्मी करंदीकर यांनी फोनवर मिळालेल्या माहिती नुसार तात्काळ धुळे पोलिसांशी संपर्क केला.
23 वर्षीय युवक धुळ्यातील ज्या भागातून फेसबुक लाईव्ह करत होता, त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते. रविवारी रात्री साधारण 8 वाजता हा प्रकार समोर आल्यानंतर धुळे पोलिसांनी अवघ्या 25 मिनिटात या तरुणाचा शोध घेतला. त्याने आपल्या हातची नस कापली होती. पोलिसांनी तात्काळ या तरूणाला रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्याला डिस्चार्ज ही मिळाला. आता त्याचं काईन्सिलिंग केलं जाणार आहे.
दरम्यान पोलिसांनी जर तत्परता दाखवली तर काय होते. हे या निमित्ताने रश्मी करंदीकर यांच्या समयसुचकतेने दिसून आले. धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी देखील या प्रकरणात तात्काळ लक्ष घातल्याने आज एका तरुणाला जीवदान मिळाले आहे.