पोलिस ठाण्यातील राणा दाम्पत्याचा चहा पिताना चा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना अटक करा
नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून त्यांना अपमानास्पद वर्तणूक मिळाली असल्याचे आरोप केले होते. हे आरोप फेटाळ्ण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. राणांच्या वकीलांकडून यावर स्पष्टीकरण आल्यानंतर नवनीत राणांच्या एका पत्रामुळे त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
हनुमान चालीसा पठारावरून नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्याला मुंबईमध्ये होतं शिवसैनिकांनी या दोघांविरुद्ध मातोश्रीबाहेर आणि खार मध्ये एकच गोंधळ घातला होता असा या प्रकारानंतर राजद्रोहाच्या कलमांतर्गत त्याला अटक देखील करण्यात आली धडकेनंतर नवनीत शाळा यांच्याबरोबर पोलीस ठाण्यांमध्ये गैरवर्तणूक केली केली असल्याच्या बातम्या बाहेर पडल्या भाजपनं या बातम्यांनी जोर लावून धरला सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा पोलीस ठाणे मधला, "आम्हाला आणखी काही म्हणण्याची आवश्यकता आहे" असं म्हणत एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.
या व्हिडिओमध्ये रवी राणा आणि रवी राणा हे दोघेही चहा पिताना दिसत आहेत त्यामुळे भाजपने केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर नेटकरांनी अनेक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे
बाबाजी रिंगे या वापरकर्त्याने तर, सॅल्यूट सर, आता खोटे आरोप करणाऱ्या व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याला म्हणजे @Dev_Fadnavis ला तुरुंगात टाका. फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे. पोलिसांची बदनामी करणाऱ्या या वाळवीला पोलिसांच्या स्प्रेची गरज आहे." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची मागणी केली आहे.
तर दुष्यंत मोहोळ या नेटकऱ्याने तर या व्हिडीओची तुलना अभिनंदन वर्धमान यांच्या व्हिडीओशी केली आहे., "पांडे साहेब चहा तर पाकिस्तान सैन्याने आपल्या शुरवीर अभिनंदन वर्धमानला पण पाजला होता, परत त्याला शारीरिक व मानसिक त्रास दिलाच होता ना ! राणा दांपत्यावर पहिला FIR दाखला झाल्यावर दुसरा वेगळा FIR दाखल केला तसेच चहा पाजल्यानंतर पुढे काय काय झाले कोणास माहीत? #रात्रीसखेळकाय_चाले?", असं म्हणत मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला.
तर अनिरूध्द गानू या वापरकर्त्याने मुंबई पोलिसांना सवाल करत विचारलंय," पोलिस आयुक्त कधीपासून सोशल मीडियावर कथित गुन्ह्याचे तपशील शेअर करत आहेत? व्यावसायिक वर्तनाचे किमान काही साम्य ठेवा."
त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत एस जे या वापकर्त्याने लिहिले आहे की, "जेव्हापासून महाराष्ट्रीय अंधभक्त जनता आणि भाजप महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्नचिन्ह लावत असल्याने..."
तर पद्माकर टिल्लू यांनी संजय पांडे यांनाच उलट उत्तरं दिली आहेत, "सर, तुमच्याबद्दल आणि तुमच्या गणवेशाबद्दल आदरपूर्वक बोलतो की, हा व्हिडिओ SM वर पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही त्यांची परवानगी घेतली होती का? ही रक्कम एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेवर आक्रमण करते का? आयपीएस अधिकाऱ्याकडून ही अपेक्षा नाही"
त्यांच्या या प्रतिक्रीयेला उत्तर देताना अजिंक्य वैद्य या वापरकर्त्याने, " पोलिस ठाणे कधीपासून वैयक्तिक जागा होऊ लागल्या आहेत? असा प्रश्न विचारला आहे.
हे आरोप प्रत्यारोप होत असतानाच नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी हा व्हिडीओ खार पोलिस ठाण्यातील असून नवनीत राणांवर अत्याचार हे सांताक्रूझ पोलिस ठाण्यामध्ये झाल्याचं म्हटलं होतं. नवनीत राणांनी त्यांना नैसर्गिक विधींसाठी देखील जाऊ दिलं जात नसल्याचे मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. पण त्यांच्याच एका पत्रामुळे त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्य़ा पत्रात त्यांनी खार पोलिसांनी मला अटक केली असून ते माझ्या बरोबर गैर व्यवहार केला. मला नैसर्गिक विधींनाही जाऊ दिलं नसल्याचे आरोप केले होते. त्यांच्या या पत्रामुळे आता त्यांचाच नव्हे तर त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांचा देखील खोटारडेपणा उघड झाला आहे.