राखी सावंत नवऱ्यापासून होणार विभक्त..

मागच्या काही दिवसांमध्ये राखी सावंत यांचा नवरा कोण आहे? याविषयी सोशलमीडियावरती मोठी चर्चा होती. त्यानंतर एका टीव्ही शो मध्ये राखी सावंत यांचा नवरा सगळ्यांसमोर आला. लोकांची ही उत्सुकता संपते न संपते तोपर्यंत राखी सावंतने पती रितेश पासून वेगळं होत आल्याचं समाजमाध्यमांवर जाहीर केलं आहे.

Update: 2022-02-14 06:47 GMT

राखी सावंतने पती रितेशपासून वेगळे होणार आहे. ही माहिती राखी सावंत यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. बिग बॉसनंतर या जोडप्याच्या नात्यात अनेक समस्या निर्माण झाल्या, ज्या सुधारण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. जेव्हा सर्व काही ठीक झाले नाही तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

राखी सावंतने पोस्ट शेअर केली आणि म्हंटल आहे की, 'प्रिय चाहत्यांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की रितेश आणि मी एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. 'बिग बॉस' नंतर बरेच काही घडले आणि अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले पण शेवटी ठरवलं की आता दोघांनी आपलं आयुष्य वेगळं व्हायचं. राखीने पुढे लिहिले की, व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी हे सर्व घडले याचे मला खूप वाईट वाटते. पण निर्णय घ्यायचा होता. आशा आहे की रितेशसोबत सर्व काही ठीक होईल. मला यावेळी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवावे लागेल. मला समजून घेतल्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल सर्वांचे आभार. राखी सावंत.

Full View

Tags:    

Similar News