मुंबईत दिवसभरात 1 लाख 27 हजार महिलांचे लसीकरण...

मुंबईमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी झाले असल्यामुळे काल फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.;

Update: 2021-09-18 06:29 GMT

सध्या देशात कोरोना रुगणांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. सध्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देखील दिला जातोय. त्यामुळे आता सरकारपुढे सर्वांचे लसीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकार नागरिकांचे लवकरात लवकर दोन्ही डोस कसे पूर्ण करता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहे.

महाराष्ट्रात देखील लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पण मागील दोन दिवसात एक गोष्ट समोर आली होती त्यानुसार मुंबईमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी झाले होते. त्यामुळे सर्व महिलांचे लसीकरण व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठवड्यातील एक दिवस हा पूर्णतः महिलांच्या लसीकरणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार काल महिलांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये शासकीय आणि महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरती असे हे विशेष लसीकरण सत्र राबवले गेले. यामध्ये काल दिवसभरात एकूण 1 लाख 27 हजार महिलांनी लस घेतली आहे.


Full View

Tags:    

Similar News