बीड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून,आज दुपारी हा मेळावा होणार आहे. तर भाजप खासदार प्रतिम मुंडे गोपीनाथ गडावरून भगवानगडाकडे रवाना झाले आहेत. प्रतिम मुंडेंच्या रॅलीचे ठीक-ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड रॅलीला सुरुवात झाली आहे. प्रीतम मुंडेंनी गोपीनाथगडावर गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले असून त्यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली आहे.
यादरम्यान सिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूर मार्गे रोहतवाडी, चुंबळीहुन सावरगाव घाटला पोहोचणार आहे. मेळाव्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तर प्रतिम मुंडेंच्या निघालेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळतांना पाहायला मिळत आहे.