"दोन वर्षापुर्वी त्यांच्याच मुलीने आत्महत्या केली होती"

"शांता राठोड यांनी नवऱ्याच्या हत्येची आणि मुलीच्या आत्महत्येची साधी पोलीस नोंदही का केली नाही?" पूजा चव्हाणचे वडिल लहू चव्हाण यांचा सवाल;

Update: 2021-03-02 14:30 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अखेर पूजाच्या वडिलांनी मौन सोडले आहे. पूजाची बदनामी थांबवा असे आवाहन त्यांनी आधी केले होते. पण यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाहन करुनही पूजाची बदनामी थांबवली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

शांताबाई राठोड यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "त्यांचे मीस्टर गेल्यापासून आम्ही मागच्या 25 वर्षात आम्ही त्यांचं तोंड बघीतलेलं नाही. त्या काय करतात? कुठ रहातात? कुणा सोबत रहातात? याची आम्हाला काहीच माहिती नाही."

"दोन वर्षापुर्वी त्यांच्याच मुलीने आत्महत्या केली होती, त्याची साधी पोलीस स्टेशनला नोंद देखील केली नाही. त्यांचा नवरा कशामुळे गेला त्याचीही नोंद नाही. त्यांनी नवऱ्याच्या हत्येची आणि मुलीच्या आत्महत्येची साधी पोलीस नोंदही का केली नाही.? आणि हे माझ्या मुलीचा पुळका घेवून बोलतायत."

संजय राठोड यांनी पूजाच्या कुटुंबियांना ५ कोटी रुपये दिल्याचा आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. यावर कोण काय बोलतंय ते माहीत नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत असे सांगत त्यांनी पैसे घेतल्याच्या आरोपावर बोलणं टाळलं.

शांताबाई राठोड दूरूच्या नातेवाईक आहेत मात्र आमचे कसलेच नातेसंबंध नाहीत, असे सांगत मी आता थकलोय कृपया आता तरी बदनामी थांबवा अशी विनवणी त्यांनी तृप्ती देसाई, शांताबाई राठोड, चित्रा वाघ यांना केली आहे. पूजा ही तुमच्या लेकीसारखी आहे तिला न्याय द्या पण बदनामी करू नका असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती, असेही त्यांनी सांगितले आहे. पण पूजाच्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्याची गय केली जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News