अमृता फडणवीस यांच्या फोटोवर कॉमेंट बॉक्स मध्ये पुन्हा धुरळा...

Update: 2022-01-06 10:47 GMT

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या नेहमीच समाज माध्यमांवर चर्चेत असतात. मग त्या त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे किंवा त्यांनी केलेल्या ट्विट मुळे... त्यांनी काहीही ट्विट केलं किंवा त्या काही व्यक्त झाल्या की समाजमाध्यमांवर उलट-सुलट चर्चा होत असते. अमृता फडणवीस या नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आज त्या पुन्हा चर्चेत आहेत. त्याच कारण देखील त्यांनी केलेले ट्विट आहे. आज अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत एक कॅपशन लिहिलं आहे ज्याची मोठी चर्चा आता समाज माध्यमांवर आहे.

त्यांनी योगासन करत असलेला एक फोटो प्रसिद्ध केला आहे. हा फोटो प्रसिद्ध करत त्यांनी म्हटले आहे की, ''या जगाची अयोग्य बाजू ही वरच्या दिशेला आहे. ती बाजू आता उलट्या दिशेने फिरवायची गरज आहे. आणि जर असं केलं तर जगाची जी योग्य बाजू आहे ती वरती येईल''

त्यांनी केलेल्या या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत यामध्ये अनेक आणि त्यांचं कौतुक केले तर अनेकांनी त्यांना सल्ले दिले आहेत.

VC या एका ट्विटर वापरकर्त्याने या फोटोच्या कॉमेंट मध्ये लिहिलं आहे की ''मी हे आसन कधीच करू शकत नाही.. हे आसन करून पाहिलं पण कधीच जमलं नाही.. खूप छान मॅडम. फडणवीसजींना विनम्र अभिवादन जे स्वच्छ आणि सभ्य मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांना शुभेच्छा

तर RAM या ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की, " मेकअप + योगा...पतंजलीने स्टार प्रचारक म्हणून अमृताजी यांची निवड करावी"

मिलिंद गोरे हे या फोटोच्या कॉमेंट मध्ये म्हणतात " अग बाई, तूच उलटे पहात आहेस त्यामुळे तुला जग तसे दिसत आहे.. तू हो आधी सरळ मग सगळे सरळ व्यवस्थित दिसेल होईल. बाकी योगा करताना मेकप करणे compulsory असते का? आणि हे उलटे करतानाचा व्हिडिओ टाका, कुणाच्या तर मदतीने प्रकार करून फोटो नका काढू.

अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी ट्विटर वरती शेअर केलेल्या फोटो वरती येत आहेत...

Tags:    

Similar News