सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांचा फोटो पॉर्न पेजवर, पोलिसात तक्रार दाखल..

Update: 2022-06-13 09:09 GMT

समाजमाध्यमांचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. खरं तर समाज माध्यमे ज्या हेतूने उदयास आली त्या हेतूने त्यांचा वापर न होता गैरकृत्य करण्यासाठी त्यांचा वापर होण्याचे प्रकार आता मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आता हेच पहा ना, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांचा फोटो फेसबूक वरील एका ग्रुप वरती शेअर करण्यात आला आहे. फेसबुकवर जीवन साथी (😊jivan🤝 sathi😘💞) या नावाने चालणाऱ्या ग्रुपवरती अश्लील व्हिडिओज शेअर केले जातात. त्या ग्रुप वर सत्यभामा सौंदरमल यांचा फोटो शेअर करून त्यांना लग्नासाठी वर हवा असल्याचं म्हंटल आहे.




 आता हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यानंतर MaxWoman ने सत्यभामा सौन्दरमल यांच्याशी संपर्क केला. त्यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसात धाव घेतली आहे. व त्या आता या विरोधात तक्रार दाखल करत आहे. एखाद्या महिलेचा फोटो आशा ग्रुप वर शेअर करायचा आणि लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे असे प्रकार समाज माध्यमांवर आता सर्रास घडत आहेत.

कुठल्याही महिलेचा फोटो वापरून लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार अशा ग्रुपच्या माध्यमातून केले जाते. जर आपण हा ग्रुप पाहिला तर या वरती अशा अनेक महिलांचे फोटो आहेत. त्यांचे फोटो वापरून अत्यंत घाणेरड्या कॉमेंट्स लिहून अश्लील पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. खरंतर असे अनेक ग्रुप वेगवेगळ्या समाज माध्यमांवर सक्रिय आहेत. अशाप्रकारे कोणत्याही महिलेचे फोटो घ्यायचे आणि त्यांचा फोटो वापरून कसलाही मजकूर लिहून लोकांना फसवायचे असे प्रकार या पुर्वी देखील अनेक वेळा घडले आहेत. पण यामुळे आज अनेक महिलांचे आयुष्य उध्वस्त झाली आहे. मग अशा समाजमाध्यमांवरील ग्रुपवर कारवाई कधी होणार? सायबर क्राईम विभाग नक्की काय करत आहे? असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत..

Tags:    

Similar News