पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार..?

Update: 2023-07-31 05:53 GMT

पेट्रोल-डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत 15% घसरण झाल्यानंतर सध्या या चर्चा सुरु झाल्या आहेत. 10 जुलै रोजी कच्चे तेल 35 टक्क्यांनी स्वस्त झाले होते, मात्र यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटची कपात केली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपयांच्या वर आणि डिझेल 90 रुपयांच्या वर आहे. दरम्यान, पेट्रोलियमचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) या तीन सरकारी कंपन्यांच्या नफ्यात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या कंपन्यांना सध्या प्रति लिटर 10 रुपये उत्पन्न मिळत आहे.

Tags:    

Similar News