"जे गेले त्यांचे हिशोब कुठे आहेत?" - किशोरी पेडणेकर

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर kishori pednekar यांना २०२० च्या बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या पार्श्वभूमीवर पेंडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

Update: 2024-01-30 10:35 GMT


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर kishori pednekar यांना २०२० च्या बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या पार्श्वभूमीवर पेंडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

"ईडीचे पहिले पत्र हस्तलिखित होते. त्यात माझ्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले होते. मी या आरोपांचा कधीही मान्य करणार नाही. महापौर म्हणून मी चांगलं काम केलं असेल आणि टार्गेट होणार असेल तर मी सामोरी जायला ही तयार आहे." आस या पत्रकार परिषदेत पेंडणेकर म्हणाल्या आहेत.

"महापौर म्हणून माझ्यासोबत स्थायी समिती, विरोधी पक्ष नेतेही काम करत होते. केवळ महापौरांकडे काय अधिकार आहेत? महापौर म्हणून मी आयुक्तांवर दबाव टाकलेला नाही," असंही पेंडणेकर म्हणाल्या.

"आता तर महापौर नाही, नगरसेवकही नाही... मग कुणाच्या दबावाखाली काम करतांयेत? जे गेले त्यांचे हिशोब कुठे आहेत, जे राहिलेत त्यांच्याकडे हिशेब मागितला जातोय, आम्ही हिशोब देऊ," असं पेंडणेकर म्हणाल्या.

"ज्या रस्ते कामांच्या टेंडरवर आदित्य ठाकरे आवाज उठवतायेत ते रद्द होतायंत. या कामांमध्ये घोटाळा झाला असेल तर ईडीने त्यांचाही तपास करावा," असंही पेंडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेंडणेकर यांनी ईडीच्या चौकशीचा सामना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी महापौर म्हणून चांगलं काम केल्याचा दावा केला आहे. तसेच, माजी महापौर आणि सध्याच्या नगरसेवकांच्या हिशोबांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "जे गेले त्यांचे हिशोब कुठे आहेत?" असा ही टोला ED चौकशी आधी पेंडणेकरांनी लावला आहे. 

Tags:    

Similar News