पंकजा मुंडे यांची लॉटरी, प्रीतम मुंडे नाही तर पंकजा मुंडेंना बीडची लोकसभा उमेदवारी
बीड लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना मिळेल की पंकजा मुंडे यांना मिळेल या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. कारण पंकजा मुंडे यांना बीडची लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे.
देशामध्ये लोकसभा निवडणुकीला महत्त्वाचं स्थान दिलं जातं त्यामध्येच महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघ महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. भाजपच्या गोठातून आगामी निवडणुकीसाठी आपला बीड लोकसभेचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. बीड लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना मिळेल की पंकजा मुंडे यांना मिळेल या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. कारण पंकजा मुंडे यांना बीडची लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे.
पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून आता लोकसभा लढवतील. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी २० नावांची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे पंकजा मुंडेंचा वनवास संपला आहे, मात्र प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच पूर्वी १४ वर्षांचा वनवास असायचा. मात्र हा पाच वर्षांचा वनवास पुरे असं म्हटलं होतं. तो वनवास भाजपाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आल्यानंतर संपला आहे. कारण पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे या विधानसभेची २०१९ ची निवडणूक हरल्या होत्या. त्यानंतर त्यांना साईडला करण्यात आल्याच्या चर्चा वारंवार रंगल्या. इतकंच काय त्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जातील अशाही चर्चा रंगल्या. मात्र पंकजा मुंडे यांनी कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता आपली वाटचाल करणं सुरु ठेवलं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांचा पाच वर्षांचा वनवास आता संपला आहे. असं असलं तरीही पंकजा मुंडेंची सख्खी बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकिट मात्र कापण्यात आलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
11 मार्चला पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या “एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, म्हटलं वनवास पाचच वर्षांचा असावा या युगात बाबा. जुन्या काळात १४ वर्षांचा वनवास होता, आम्हाला पाच वर्षांचा वनवास पुरे झाला की तुम्हाला अजून पाहिजे? तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर? मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहिलं आहे, आत्तापर्यंत काय लिहिलं होतं? तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार बोलत नाही. पण मी फार दुःख, यातना, वेदना भोगून झाल्या आहेत. सगळं काही भोगूनही मी चेहरा हसरा ठेवते. याचं कारण तुम्ही म्हणजेच माझे सगळे कार्यकर्ते आहात.”
पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्याचे आरोपही त्या काळात झाले होते. तेंव्हा त्या २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्या हरल्या होत्या. त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे निवडून आले होते. पंकजा मुंडे या आक्रमक महिला नेत्यांपैकी एक नेत्या आहेत. त्यांनी कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता त्यांनी पक्षाविषयीची निष्ठा कायम ठेवली. त्यांना आज लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने प्रीतम मुंडेंना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवारी एकाच घरात राहिली असली तरी पंकजा मुंडे यांची लॉटरी लोकसभेसाठी लागली असं म्हणायला हरकत नाही...