पंकजा मुंडेंची 'चाय पे चर्चा'....

Update: 2021-09-27 10:56 GMT

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या मुलाला त्याच्या हॉस्टेलवर सोडण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडे नुकत्याच मायदेशी परतल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात परतताच पंकजा ताई पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मतदारसंघातील भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या आहेत. तर आज परळी दौऱ्यावर असतांना पंकजा मुंडे यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करत चहाचा आस्वाद घेतला.

पंकजा मुंडे यांनी खुद्द याबाबत ट्वीट करत म्हंटले आहे की, "परळीकरांच्या भेटी घेत असताना आज शहरातील आंबेवेस भागातील 'हॉटेल म्हाळसांकांत' मध्ये नागरीकांशी चर्चा करत चहाचा आस्वाद घेतला. शहरातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये नागरीकांशी संवाद साधताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

पंकजा मुंडे यांनी रविवारी राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडाला भेट देऊन दर्शन घेतले होते. तर यावेळी याठिकाणी उभारलेल्या भव्य स्मारकाला भेट देताना स्वतः पाण्यात उतरून मुर्तीचे दर्शन घेत मेळावा मैदानाची पाहणी केली. तसेच कोरोनाचे नियम पाळत दसरा मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Tags:    

Similar News