"कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं" - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांच्यासह पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे.;
सध्या राज्यात दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणांची चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणांवर सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यातच पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता.
त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे....
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता, गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
https://twitter.com/Pankajamunde/status/1320735607182688256
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या रॅलीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं पंकजा यांनी ट्विटर वर संताप व्यक्त केला आहे.