कित्येक दिवस झालं राज्यात अनेक गोष्टी बदलल्या पण गौतमीची क्रेझ काय कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यात गौतमी पाटील आणि रडा हे जे काय एक समीकरण झालं आहे ते पण अद्याप काय थांबायला तयार नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की हजारोंची गर्दी, टाळ्या, शिट्या हे काय नवीन नाही.. पण तिचा डान्स पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून अनेक वेळा अनेक नको नको त्या घटना देखील घडल्या आहेत. आता अहमदनगर मध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाला. आता सारखं सारखं होणारा हा गोंधळ पाहून गौतमी पण चांगलीच भडकली आणि मग पुढे काय झालं हे... पाहूच पण तुम्ही पहिला आमच्या चॅनेलला Like व subscribe करा बाकी कार्यक्रमात काय घडलं हे आम्ही तुम्हाला पुढच्या एका मिनिटांमध्ये सांगूच...
अहमदनगरमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. अहमदनगरच्या नागापूर येथे मंगळवारी रात्री आयोजित कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्यानंतर प्रेक्षकांनी दगडफेक देखील केली. या दगडफेकीत काही प्रेक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. नागापूर येथे एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. आता या घटनेनंतर गौतमीन मात्र एक मोठा निर्णय घेतला आहे. असे हुल्लडबाज प्रेक्षक जिथे असतील त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार नसल्याचे गौतमी पाटील हिने सांगितल आहे.
याबरोबरच अशा प्रकारे कार्यक्रमात गदारोळ करणाऱ्यांचा दिखील त्यांनी चांगला समाचार घेतलाय, ''तुम्हाला दगडफेक करायची असेल तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका. प्रत्येकाच्या घरात आई बहीण आहे. आम्ही सुद्धा कलाकार आहोत. तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही येतो तुम्ही त्याचा आनंद घ्या. असे काही झाले तर मी कार्यक्रम बंद करणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे..