राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेब ठाकरे यांच्या जुना व्हिडिओ..

“ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही." राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ..;

Update: 2022-05-04 04:30 GMT

औरंगाबाद येथे झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी चार तारखेचं अल्टिमेटम दिले होते. काल मंगळवारी, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींवरील भोंग्यांवरून आजार ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले. यासंदर्भातील एक पत्रक त्यांनी काल ट्विट केलं होतं. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर आज सकाळी अनेक शहरात मशिदीमध्ये आजण सुरू असताना अनेक मनसैनिकांनी मशिदी बाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चाळीसा लावली. मशिदीबाहेर हनुमान चाळीसा लावल्याने महाराष्ट्रातून आज अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

हे सगळे होत असताना राज ठाकरे यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, "ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धर्म हा राष्ट्राच्या विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव" हा व्हिडिओ राज ठाकरे यांनी शेअर केला असून याला त्यांनी काहीही कॅशन दिलेले नाही.


राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज..

मुंबईतील काही अनुसूचित होऊ नये यासाठी 465 जणांना शहराबाहेर पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना आयपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात शहरातील 1144 मशिदींपैकी 803 मशिदींनी नियमानुसार लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे.

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी , 3 मे रोजी पोलिसांनी 855 जणांना कलम 149 अंतर्गत नोटीस दिली आहे. यापैकी ४६५ जणांना सीआरपीसी १४४ अंतर्गत १५ दिवसांसाठी मुंबईबाहेर पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांना पूर्ण सूट दिली

राज यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी मुंबईसह संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोलिसांना सूट दिली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका. असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.

Tags:    

Similar News