मागच्या काही दिवसांपूर्वी दडी मारलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अचानक पाऊस सुरू झाला आणि कोरडी पडलेली धरणे तुडुंब भरून वाहू लागली. बहुतांश महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे. यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्यामुळे लांबणीवर पडलेल्या पेरण्या देखील शेतकऱ्यांच्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो की काय असा प्रश्न होता? मुंबईकर देखील याच प्रश्नामुळे त्रस्त होते. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा कमी झाला होता. पण आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं फेसबुक युट्युब आणि ट्विटर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका...
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव आता भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबईकरांच्या पाण्याची चिंता पूर्णतः मिटली आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई व आसपासच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये आता पाणी ओव्हर-फ्लो झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काय माहिती दिली आहे पहा..
मुंबई महानगरपालिका नागरिकांना दररोज सुमारे 385 कोटी लिटर एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करत असते हा पाणीपुरवठा वेगवेगळ्या सात तलावांमधून केला जातो. आज सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडेलवर याबाबाद देण्यात आलेली माहिती काय आहे पहा...