'माल' शब्दाला आपत्ती घ्या - मुंबई पोलिस

Update: 2021-09-22 04:39 GMT

एखाद्या सुंदर मुलीचं वर्णन करताना तुम्ही किती वेळा 'काय माल आहे' असं म्हटलंय? निदान 'कडक माल' म्हटलंच असेल. अरे, निदान 'एकदम कडक माल' वालं मीम तरी फॉरवर्ड केलंच असेल. यापुढे एखाद्या मुलीसाठी किंवा अंमली पदार्थासाठी 'माल' शब्द वापरताना काळजी घ्या. मुंबई पोलिसांनी या शब्दावर आपत्ती घ्या अशा आशयाचं एक ट्वीट केलंय.

आपल्या क्रिएटीव्ह Tweet साठी मुंबई पोलिसांचं @MumbaiPolice हे हँडल नेहमीच चर्चेत असतं. एखादा शब्द चर्चेत आला किंवा ट्रेंडींग मध्ये आला की तो शब्द उचलून बऱ्याचदा मुंबई पोलीस ट्वीट करतं. परवा पासून अदानींच्या मुंद्रा पोर्ट ( Mundra Port ) वर हेरॉइन ( Heroin ) पकडल्याच्या बातम्या आल्या नंतर चित्रपटातील 'कडक माल' मीम्स व्हायरल झाले होते.


 




त्यानंतर पोलिसांनी हे ट्वीट करून जनतेला सावध केलं आहे. माल हा स्लँग शब्द असून एखाद्या मुलीचं वर्णन किंवा अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठी माल शब्दाचा वापर होऊ शकत नाही. त्यामुळे महिला सुरक्षेच्या ( Women Safety ) दृष्टीकोनातून ही हा धडा महत्त्वाचा आहे.




 


 

Tags:    

Similar News