Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्स लपवून नूपूर पोहचली क्रूझवर; आर्यन सोबत NCB ने केली होती अटक

Update: 2021-10-05 13:51 GMT

शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवर ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला आणि ड्रग्ज पार्टीचा भांडाफोड केला. एनसीबीने अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यनसह 9 आरोपींना ताब्यात घेतले असून सर्वांची चौकशी सुरू आहे.

याच आरोपींपैकी एक म्हणजे नुपूर सारिका हे नाव सुद्धा समोर आले आहे. नुपूर सारिका दिल्लीत लहान मुलांची शिक्षिका म्हणून काम करते. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी मोहक जैस्वाल याने नुपूरला ड्रग्ज दिले होते. तर आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, नूपुर सारिका ही सोबत असलेलं ड्रग्ज सॅनिटरी पॅडमध्ये लपवून रेव्ह पार्टीमध्ये पोहोचली होती.

तर, कोर्टात आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी, अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजू आयकून घेतल्यावर आर्यन खानसह इतर दोन्ही आरोपींना ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Tags:    

Similar News