मुख्यमंत्र्यांचा बतावणींमध्ये प्रथम क्रमांक! - सुषमा अंधारे

Update: 2024-02-18 05:03 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे यांच्या दाव्यानुसार, त्यांना मारण्याचा कट रचला गेला होता आणि मातोश्रीवर हल्ला करण्याची बैठकही आयोजित करण्यात आली होती. या आरोपांवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर तीव्र टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्या विधानांना "बालिश आणि खोटे" म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "शिंदे यांचे बोलणे उडाणटप्पूसारखे आहे आणि त्यांना असे बोलणे शोभत नाही. हे दुर्दैवी आहे."

अंधारे यांनी शिंदे यांच्या वक्तव्यांवर टोला लगावून म्हटले, "आता आपण बतावणी स्पर्धा आयोजित करायला हव्यात. रोज नवीन बतावणी ऐकायला मिळेल." त्या म्हणाल्या, "कधी रामदास कदम, तर कधी गुलाबराव पाटील, श्रीकांत शिंदे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या बतावणी ऐकू येतात. पण शिंदे यांच्या नुकत्याच विधानाला तर बतावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळायला हवा."

अंधारे यांनी शिंदे यांना "खोटे बोलणारे" आणि "नाटक करणारे" असेही म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "शिंदे यांनी सत्तेसाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना गद्दारी केली आहे. आता ते लोकांसमोर खोटे बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत."

सुषमा अंधारे यांच्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. शिंदे यांनी अंधारे यांच्या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags:    

Similar News