सध्या राज्याच्या राजकारणात गुवाहाटी हे ठिकाणी अत्यंत चर्चेचा विषय आहे. शिवसेनेत आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली आहे. शिंदे आपल्यासोबत असलेल्या 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुवाहाटी मध्ये एका हॉटेल मध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज हा नेता गुवाहाटीला पोहोचला तर हा तेथून पळून आला आशा अनेक बातम्या पाहायला मिळतं असतील. त्यामुळे कोणी गुवाहाटीला पोहोचले अशी बातमी आली की, अनेकांना उत्सुकता लागते की आता कोण गेलं? पण आता गुवाहाटीला ज्या सहा मुली जात आहेत त्या काही या राजकीय नेत्यामप्रमाणे बंड करून चाललेल्या नाहीत. तर या मुली महाराष्ट्राची मान उंचावत उच्च शिक्षण घेण्यासाठी गुवाहाटी येथे जात आहेत. त्यांची IIT गुवाहाटी येथे निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी यासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनच्या या सहा विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले आहे. एकलव्याच्या 6 विद्यार्थिनींना आयआयटी गुवाहाटी येथे मास्टर कोर्स साठी प्रवेश मिळाला आहे. एकलव्याच्या या सहा मुलींची IIT गुवाहाटी येथे निवड झाली असल्याची माहिती एकलव्य फौंडेशनचे संस्थापक व सीईओ राजू केंद्र यांनी दिली आहे.
अभिमानाची बातमी!
— Raju Kendre (@RajuKendree) June 21, 2022
एकलव्यच्या सहा विद्यार्थिनींना आयआयटी गुवाहाटी येथे मास्टर्स कोर्ससाठी प्रवेश मिळाला आहे!
Eklavya is pleased to announce that our six students secured admission to IIT Guwahati for the MA program.
Congratulations to our students and team! #EklavyaForIIT pic.twitter.com/XJoiudWqZZ