शिक्षित शब्दाचा अर्थ आणि सावित्री होण्याचा मतितार्थ खरंच कळला आहे का?
माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी...स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी,सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी !सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक समाजाच्या चेतनेला व त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.;
समाजातील निर्माते, धोरणकर्ते, नीतीनिर्धारक आणि महान व्यक्तींना कसे लक्षात ठेवायचे! त्यांच्या फोटोंवर हार-फुलं चढवून, चर्चा आयोजित करून किंवा परिचर्चेत भाषण देऊन. सर्व चाहत्यांच्या आपल्या आपल्या पद्धती आहेत आणि त्यांच्या नायकाला आपल्या पध्दतीने लक्षात ठेवण्याचा त्यांना हक्क आहे. मी या परंपरा निभावण्याच्या पुढची गोष्ट सांगत. आमच्या समोर प्रश्न हा आहे की ज्या प्रेरक विभूतींचे आपण स्मरण करतो, त्यांचे 'आदर्श आणि मूल्य' हे आपण आपल्या आयुष्यात कुठे आणि कसे उतरवत आहोत. त्यांच्या आदर्शांना जीवन जगत असताना, आपल्या काळात आणि समाजात कसे रुजवत आहोत !
'सावित्री' आणि 'शिक्षित केलं' हे शब्द आपण कित्येक वर्षे ऐकत आलो आहोत. पण या शिक्षित शब्दाचा अर्थ आणि सावित्री होण्याचा मतितार्थ खरंच कळला आहे का? सावित्रीची जीवन गाथा, तिचा संघर्ष सर्वश्रुत आहे. मीही ऐकला होता, वाचला होता. पण खरंच तिची तेवढीच ओळख आहे का ? लोकशास्त्र सावित्री या नाटकाच्या निमित्ताने या ऐकण्या- वाचण्याच्या पलीकडे सावित्रीच्या जगण्याचे सत्व मी अनुभवले. समाज, आपला देश घडवणाऱ्या थोर विचारकांच्या विचारांना ऐकण्यापेक्षा ते जगण्यात आणि आपले नवीन विचार निर्माण करण्यातच माणूसपण लपलेले आहे.
संकटकाळ येतो त्यावेळी समाजाला नवीन दिशा देऊन कोण जगवतो? किंवा कोण घडवतो? "मला काय करायचं? मी आणि माझं घर भलं" असा संकुचित विचार सावित्रीने केला नाही. अंगावर शेण आणि दगड झेलूनही ती ठामपणे आपल्या ध्येयासाठी उभी राहिली. सामंतवादी सत्तेला ,अस्पृश्यतेला , शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीला अंकुश लावले. माणुसकी घडवण्यासाठी तिचं माध्यम होतं शिक्षण. सावित्री या साठी सावित्री झाली कारण ती माणूस म्हणून जगली. केवळ शिक्षित नाही तर अस्तित्व निर्माणाचे, घडवण्याचे आंदोलन लढली. एक सामान्य महिला असामान्य सृजन करून गेली . मग माझ्यातली तुमच्यातली ती सावित्री, ती जाणीव हरवते कुठे? थिएटर ऑफ रेलेवन्सने रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित 'लोक-शास्त्र सावित्री' या नाटकाच्या माध्यमातून सृजनकार आणि सावित्री यांचा समन्वय साधला.
माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी...स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी,सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी !
सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक समाजाच्या चेतनेला व त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा : नाटक "लोक-शास्त्र सावित्री" 1 डिसेंबर,2021 ला नाशिक येथे प्रस्तुत होणार!
मराठी रंगभूमीचा वैचारिक प्रगतीशीलतेचा वारसा पुढे घेऊन जाणारे"थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, 1 डिसेंबर 2021, बुधवार रोजी, संध्याकाळी 6.00 वाजता रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित युग परिवर्तक नाटक " लोक - शास्त्र सावित्री " हे नाटक परशुराम साईखेडकर नाट्यगृह, शालिमार नाशिक येथे प्रस्तुत करणार आहेत.