लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याण मध्ये उघडकीस आली होती .या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक दवखील झाली आहे .आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयासह पोलिसांची भेट घेतली .त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडितेवर लैगिंक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मुलीच्या कुटुबीयांचे म्हणणे आहे की तिने आत्महत्या केली नसुन तिची हत्या केली गेली. त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी वाघ यांनी केली. ३७६ डी शक्ती कायदा ई, एफ.व आयटीएट प्रमाणे गुन्हा दाखल करा अस दवखील त्या म्हणाल्या.
एका तरूणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सात तरुण गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या गैरकृत्यामध्ये एका तरुणीचा सहभाग होता .या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याने शहर हादरले होते. कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या प्रकरणी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याण मध्ये पीडित कुटुंबीयांची त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच 12 वीत 71 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती.
या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यांपैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. इस्टाग्रामवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात मोठ्या घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी . तिचे कुंटुंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. आठ दिवसांनी पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले. पुढे बोलताना कायद्याची प्रभावी अमलबजावणी झाली तरच नराधम विकृताना कुठे तरी चाप बसेल अशी मागणी केली.