नोबेल पारीतोषिक विजेती मलाला युसुफझाई अडकली लग्नबंधनात!

Update: 2021-11-10 05:16 GMT

शांततेचं नोबल पारीतोषिक विजेती पाकिस्तानी ऍक्टीव्हिस्ट मलाला युसुफझाई (Malala Yousafzai) हि मंगळवारी लग्नबंधनात अडकली आहे. ट्विटर वर पती असेर आणि आई वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत तिने लग्नाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. तिने हे फोटो पोस्ट करत म्हटलं आहे, "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मौल्यवान दिवस आहे. असेर आणि मी आयुष्यभर साथीदार होण्यासाठी गाठ बांधली. बर्मिंगहॅममध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत एक छोटा निकाह समारंभ साजरा केला. कृपया आम्हाला तुमचे आशीर्वाद पाठवा. पुढच्या प्रवासासाठी आम्ही एकत्र चालण्यास उत्सुक आहोत."


मलालाच्या या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील तिला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात ते म्हणतात, "अभिनंदन, मलाला आणि असेर! सोफी आणि मला आशा आहे की तुम्ही तुमच्या खास दिवसाचा आनंद लुटला असेल - आम्ही तुम्हाला आयुष्यभर एकत्र आनंदी सहवासाच्या शुभेच्छा देतो."


याशिवाय धडाडीच्या ज्येष्ठ भारतीय महिला पत्रकार बरखा दत्त यांनीदेखील तिला "अभिनंदन मलाला!" म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे मलाला युसुफझाई (Malala Yousafzai)?

मलाला युसुफझाई एक पाकिस्तानी विद्यार्थी आणि शैक्षणिक कार्यकर्ती आहे. मुलींसाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी, विशेषत: मुलींना शाळेत जाऊ देण्याच्या तिच्या मोहिमेसाठी ती ओळखली जाते. ऑक्टोबर २०१२ मध्ये तीच्यावर तालीबान्यांकडून झालेल्या गोळीबारात ती पडली होती. या हल्ल्यावेळी तीचं वय फक्त १५ वर्षे होतं. या हल्ल्यानंतर तीचं कुटूंब इंग्लंडमध्ये स्थायिक झालं आणि आजता गायत ते तिथेच राहत आहेत. तिच्या या मोहिमेसाठी तिला २०१४ ला शांततेचं नोबेल पारीतोषिक देण्यात आलं. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नोबेल पारीतोषिक जिंकणारी ती सर्वात तरूण व्यक्ती ठरली आहे.



 


Tags:    

Similar News