निर्मला सितारमणांची जबाबदारी, पृथ्वीराज चव्हाणांची भीती
निर्मला सितारमण यांना जबाबदारी पेलवता येईल का? पृथ्वीराज चव्हाण
कोरोना व्हायरस ने निर्माण झालेले अर्थसंकटाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेल्या विचारांबाबत माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना आपले विचार व्यक्त केले.
त्यामध्ये त्यांनी सर्वधर्मीयांच्या धार्मिक स्थळांमध्ये असलेलं 1 ट्रिलिअन डॉलर किंमतीचं सोनं भारत सरकारने या देवस्थानाकडून कर्ज रुपानं घ्यावं. आणि यातील पैसा या संकटात वापरावा. सरकारकडे पैसे आल्यानंतर सरकार ने हा पैसा व्याजासह परत करावा. असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा
AatmaNirbharBharat : शेतकरी आणि मजूरांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा
सरकारने उद्योगांना उभं करण्यासाठी जे कर्ज दिलं आहे. हे कर्ज देऊन उद्योग उभं राहणार नाहीत. कर्ज उद्योग वाढवण्यासाठी दिले जातात. तोट्यातून बाहेर येण्यासाठी हे कर्ज उपयुक्त ठरणार नाही. सरकारने आता थेट मदत करायला हवी. मात्र, सरकार कर्ज देत आहे. त्यामुळं जे कर्ज घेतील ते आणखी कर्जबाजारी होतील. अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? या संकटातून बाहेर पडताना नक्की काय करायला हवं? विकसीत देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी काय केलं आहे? तसंच विकसनशिल देशांनी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी काय करायला हवे? MSME उद्योगांना बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं. या संदर्भात केलेलं विश्लेषण नक्की पाहा