निर्मला सितारामन, देशाच्या पहिल्या पेपरलेस बजेट सादरकरणाऱ्या अर्थमंत्री!
निर्मला सितारामन, देशाच्या पहिल्या पेपरलेस बजेट सादरकरणाऱ्या अर्थमंत्री!;
प्रत्येक देशवासीयाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा भाग आणि प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी गोष्ट म्हणजे देशाचं बजेट. या बजेटच्या माध्यमातून आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवलं जातं. दर वर्षी हे बजेट एका प्रिंटेड बुकलेटवर केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सादर करतात. मात्र यंदा देशाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे बजेट छापलं जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यंदा हे बजेट लॅपटॉपवर सादर करणार आहेत.
देशाचं बजेट दरवर्षी आर्थिक वर्ष संपण्याच्या दोन महिने आधी लोकसभेत सादर केलं जातं. यंदाही बजेट हे १ फेब्रुवारीला सादर केलं जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार अलिकडे अत्यंत धाडसी तसेच सामान्यांना न रुजणारे अनेक निर्णय घेत आहे. ११ जानेवारीला आलेल्या एका वृत्तानुसार केंद्रातील मोदी सरकार कामगार कायद्यात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.
कोरोना माहामारीमुळे देशात सुमारे ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर सुमारे १ कोटी ९० लाख लोक देशात बेरोजगार झाले आहेत. जनसामान्यांना कोरोना महामारीचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यात देशातील लोकांना १ फेब्रुवारीला येणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कोरोना महामारीपासून लढण्यासाठी मोदी सरकारने ५ ऑक्टोबर २०२० रोजी वस्तू व सेवा कर (GST) परिषदेच्या राज्यांना जीएसटी भरपाईचे २० हजार कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्याचा प्रत्यक्ष लाभ किती लोकांना मिळाला या बद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
देशाने कोरोना माहामारीमुळे अनेक चढउतार पाहिल्यानंतर सामान्यांना या बजेटमधून काही दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच यंदा बजेट हे छापलं जाणार नसल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या हे बजेट कसं सादर करणार हे पाहावं लागणार आहे.