"एक भाऊ कुठे गेला आणि दुसरा कुठे.." निलम गो-हे यांचा राज ठाकरेंवर निशाणा
राज्यसभेची दुसरी टर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संभाजीराजे यांची शिवसेनेनं कोंडी केली आहे. सहाव्या जागेवर दावा करत शिवसेनेनं इथे आपलाच उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच संभाजी राजे यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर दिली आहे. पण या अटीमुळे संभाजीराजे नाराज असून त्यांनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे. या सगळ्यावर विधान परिषद उप सभापती निलम गो-हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे की, "सहाव्या जागेसाठी शिवसेनेला राष्ट्रवादी मतदान करणार आहे अशी माझी माहिती आहे. राज्यसभा निवडणुकांचा बराच अनुभव घेतलाय. हि मोठी पद आहेत ज्यांना हि संधी मिळते त्यांनी समाजाला न्याय द्यावा"
राज ठाकरेंवर सुद्धा टीकास्त्र..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केलीय या नंतर आता शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपसभापती यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेंबाच्या मार्गदर्शनाखाली काम केलं पण एक बंधू कुठल्या ठिकाणी पोहोचली आणि दुसरे बंधू कुठं पोहोचले यांचा ज्याचा त्यानं विचार केला पाहीजे. राज ठाकरेंना राजकारणात वापरुन घेण्याचं काम सुरु असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती त्यावरुन बरच वादविवाद देखील झाला होता.राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द झालाय त्यामुळे रामाचं दर्शन त्यांना घेता आलं नाही. देवाचं दर्शन आपण घेत नसतो तर देव ठरवत असतो कुणाला दर्शन द्यायचं आणि कुणाला नाही असं सांगत निलम गो-हे यांनी राज यांच्यावर निषाणा साधला आहे.
नवनीत रणांवर सुद्धा केला घणाघात..
संसदीय अधिकार समिती समोर खासदार नवनीत राणा आज आपले म्हणणे सादर करणार आहेत. यावरून शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी नवनीत राणा यांना टोला लगावलाय. संसदीय कामकाजासाठी हा विशेष अधिकार वापरायचा असतो. खासदारांचे जे हक्क आहेत त्यांच्या मध्ये कुठेही क्रीमिनल प्रोसीजर कोड यावर अधिकार नाहीत. जेव्हा एखाद्या आमदारावर किंवा खासदारावर गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्याला यातून सुटका नसते. संसदीय कामामध्ये अवमान कारक मुद्दाम वर्तन केलं असेल तर क्रिमनल प्रोसीजर कोर्डसाठी थेट न्यायालयात जायला लागते.त्यामुळे या सर्वांची बंधने पाळली जातील अशी यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.