खडतर परीस्थितीवर मात करून ती उत्तीर्ण झाली न्यायधिशांची परिक्षा

मध्यमवर्गीय कुटूंबातील निकीशा उत्तीर्ण झाली न्यायाधिश पदाची परीक्षा

Update: 2022-04-11 07:42 GMT

 जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असला कि उंच भरारी घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. अगदी हेच खरं करून दाखवलं आहे चंद्रपुरच्या ऍड. निकिशा पठाण या तरूणीने! अतिशय खडतर परिस्थितीतून तिने कठीण असणारी न्यायाधिश होण्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील मुलीही त्यांनासंधी मिळाल्यावर त्याचं सोनं करून दाखतात हे सिध्द केलं आहे.

चंद्रपूर शहरातील मुस्लिम समाजातील महिला वकील आता न्यायाधीश झाली आहे. शहरातील घुटकाळा वॉर्डात वास्तव्याला असलेली मध्यमवर्गीय कुटुंबातील निकिशा पठाण हिने खडतर परिस्थितीत न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. आसपासच्या लोकांमधून टोकाचा निरुत्साही प्रतिसाद असताना निकीशाने उत्तम अभ्यासाच्या बळावर यश खेचून आणले. आपल्या ध्येयाप्रती सतत परिश्रम केल्याने यश प्राप्त होते अशी भावना निकिशाने व्यक्त केली. अल्प शिक्षित मुस्लिम समाजात महिला वकील न्यायाधीश झाल्याचा कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. मुस्लिम समाजातील मुलीदेखील उत्तम यश प्राप्त करू शकतात हे या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे.

तिच्या कौतुकाखातर काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांच्या सुकन्या शिवानी वडेट्टीवार यांनी ट्विटरवर ट्विट केलं आहे. "अभिमानास्पद ! लड़की हूं, लड़ सकती हूं अगदी याचप्रमाणे मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा ठेवून चंद्रपूर शहरातील निकीशा पठाण हिने न्यायधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली. कुटुंबाचे प्रोत्साहन आणि तिची जिद्द यामुळे खडतर प्रवासावर मात करत यशाला गवसणी घातली.". असं म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags:    

Similar News