कोरोनाबाधीत रुग्णांवर (covid- 19 patients) उपचार करत असलेल्या डॉक्टर तसंच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्रीय आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचा क्वारंटाईन कालावधी कमी करुन १४ वरुन ७ दिवस करण्यात आला होता.
पण आता त्या त्या हॉस्पिटलमधील प्रमुखांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रकृती नुसार आणि लक्षणांनुसार ७ दिवसांपेक्षा जास्त क्वारंटाईन करण्याची गरज आहे का याचा निर्णय घ्यायचा आहे. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली पण त्यांना लक्षणं नसतील तर कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठीचे नियम त्यांना पाळावे लागणार आहेत. जर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहून कामावर परत येता येणार आहे.
हे ही वाचा
रंजक भाषेतल्या बावीस आजीच्या पोतडीतल्या गोष्टी
स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!
सौम्य लक्षणं असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी होम क्वारंटाईनमध्ये रहावे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज असल्यास कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक हॉस्पिटलने संसर्ग नियंत्रण समिती स्थापन करुन हॉस्पिटलमध्ये संसर्ग रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करत राहण्याचेही सांगण्यात आले आहे.