गौतमी पाटलांची बदनामी करते का?

पाटलांची बदनामी करत असल्याचा आरोप गौतमी पाटीलवर होत आहे. तिने गौतमी पाटीलने चाबुकस्वार हे आडनाव लावूनच कार्यक्रम करावेत अन्यथा महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही. असा इशारा गौतमीला देण्यात आला आहे.

Update: 2023-05-25 08:05 GMT

'सबसे कातील, गौतमी पाटील' असं अलीकडे सतत ऐकायला मिळत असत. राज्यात गौतमीच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. लावणी लोककलेच्या आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून गौतमी घराघरात पोहचली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग बनला आहे. गौतमी पाटीलने आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावले आहे. काही दिवसातच तिने महाराष्ट्रभरात प्रसिध्दी मिळवली आहे. गावोगावी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशा झुबंड उडते आहे. परंतु आधी गौतमी पाटील हीच्या नृत्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर मराठी इंडस्ट्री ते लावणी कलाकारांपर्यंत अनेकांनी विरोध केला. इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेणारी आज तब्बल एका कार्यक्रमाचे मानधन १ ते ३ लाख रुपये घेते. याच मुद्यावर वाद झाला होता.

वारकरी सांप्रदायातील इंदुरीकर महाराजांनी टिका केली होती. हा मुद्दा चांगलाच चर्चेला आला होता. कोणी तरी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला होता. त्यामुळे गौतमीच्या पायाखालची वाळूच सरकली. पण तरीही तिने हिंमत न हारता पुन्हा जोमाने कामाला सुरूवात केली. परंतु गौतमी पाटील आता नव्या वादाच्या भोवाऱ्यात अडकली आहे. तिचा कार्यक्रम होऊ न देण्या इशारा देण्यात आला आहे. मराठा समन्वयक राजेंद्र जराड यांनी गौतमीला इशारा दिला आहे. गौतमी पाटील हे आडनाव लावून पाटलांची बदनामी करत असल्याचा आरोप राजेंद्र जराड यांनी केला आहे. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. तिने गौतमी चाबुकस्वार हे आडनाव लावूनच कार्यक्रम करावेत. तिने आडनाव बदलून कार्यक्रम करावे. पाटील आडनाव लावून तिने कार्यक्रम केल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजेंद्र जराड यांनी दिला आहे. गौतमी पाटील हिने आडनाव बदलावं म्हणून पुण्यात एक बैठकही पार पडली. त्यात ही चर्चा करण्यात आली आहे. परंतु गौतमी पाटीलने अद्याप यावर प्रतिक्रीया दिलेली नाही.

Tags:    

Similar News