"विमानात उ××वर हिंदुत्व पण..." अमृता फडणवीस यांच्यावर नेटकऱ्यांची अश्लील भाषेत टीका..
समाजमाध्यमांवर अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं जातंय हे आता काही नवीन नाही. अमृता फडणवीस काहीही बोलल्या, त्यांनी काहीही ट्विट केलं तर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर केलेल्या अनेक कॉमेंट्स या अत्यंत अश्लील भाषेत असतात. आता इतक्या खालच्या पातळीला जाऊन कॉमेंट्स करणार्यांवर सायबर पोलीस काही कारवाई करणार आहे का?;
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल एक ट्विट करत त्या फ्रान्स या ठिकाणी होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असल्याचं सांगितलं आहे. 75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल फ्रान्स मध्ये होतं आहे. या फिल्म फेस्टिवलला अमृता फडणवीस या सुद्धा गेल्या आहेत. याच संदर्भात एक ट्विट करत त्यांनी या फिल्म फेस्टिवल साठी पोहोचले असल्याचे सांगितले आहे. व सोबत त्यांनी विमानतळावरील त्यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
Landed at #Cannes for #CannesFilmFestival2022 for a #BetterWorld
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 21, 2022
#cannes2022 #cannes2022redcarpet pic.twitter.com/wPwTHtU4as
आता अमृता फडणवीस यांनी हे ट्विट करुन सांगितल्यानंतर नेटकरी मात्र त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या प्रतिक्रिया काय आहेत त्या देखील आपण पाहूयात..
स्ट्रेट फॉरवर्ड हा ट्विटर वापरकर्ता अमृता फडणवीस यांना म्हणतो आहे की, "घामाने आंघोळ करून घाम-कोकिळा कांसला..इतिहास घडवणार का?" आता त्यांनी अमृता फडणवीस यांना हे जे उत्तर दिले आहे त्या उत्तराला संदर्भ आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या ट्विटचा. देवेंद्र फडणीस यांनी एक ट्विट करत म्हटलं होतं की, "जो पानी से नहाते है, वो सिर्फ़ लिबास बदलते है, जो पसीने से नहाते है, वो इतिहास बनाते है…" देवेंद्र फडणीस यांचे ट्विट त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा रिट्विट करत अमृता फडणवीस यांना उत्तर दिले आहे.
घामाने आंघोळ करून घाम-कोकीळा कान्सला .. इतिहास घडवणार का?https://t.co/pI7q6KrAab
— Straight Forward (@Raja_Africa) May 21, 2022
तर चंद्रेश पुलेकर यांनी सुद्धा अमृता फडणवीस यांना टॅग करत म्हटले आहे की, "त्या लाल मोठे मोठे झग्गे घालणारया बाया, काळे कोट घातलेले बाप्पे आणि तो झगमगाट, चमचमाट. कान्स हे काहितरी लार्जर दॅन लाईफ असल्यासारखं कायम वाटायचं. आता हिला बघून अस वाटतयं कि गल्लीतलं पोर-टोर पण जाऊ शकतय कि कान्सला. कान्सचा दर्जा घसरलायं कि शेटजीने विकास केलायं!"
त्या लाल मोठे मोठे झग्गे घालणारया बाया, काळे कोट घातलेले बाप्पे आणि तो झगमगाट, चमचमाट. कान्स हे काहितरी लार्जर दॅन लाईफ असल्यासारखं कायम वाटायचं. आता हिला बघून अस वाटतयं कि गल्लीतलं पोर-टोर पण जाऊ शकतय कि कान्सला. कान्सचा दर्जा घसरलायं कि शेटजीने विकास केलायं!
— chandresh pulekar (@chandresh07) May 21, 2022
Smile हे ट्विटर वापरकर्ते अमृता फडणवीस यांना म्हणत आहे की," मामी तुमच्या पेहरावात कुठं ही हिंदुत्व दिसत नाही. काय विमानात उडल्यावर हिंदुत्व पण उडून गेलं असेल. हिंदु स्त्री पेहरावाचा सन्मान ठेवा.." आता त्यांना नक्की काय म्हणायच आहे कोणास ठाऊक? पण कोण काय कपडे घालतात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता अमृता फडणवीस यांनी कोणते कपडे घालायचे, मेकप करायचा की नाही? खरंतर हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. असं पेहराव्यावरून ती व्यक्ती कुठल्या जाती धर्माची आहे हे ठरवणं योग्य आहे का तुम्हीच सांगा..
मामी तुमच्या पेहरावात कुठं ही हिंदुत्व दिसत नाही. काय विमानात उडल्यावर हिंदुत्व पण उडून गेलं असेल. हिंदु स्त्री पेहरावाचा सन्मान ठेवा
— smile (@Mrpopo1111111) May 21, 2022
अतुल सेलुकर यांनी सुद्धा एक ट्विट केला आहे आणि त्यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विट वरती अगदी असभ्य भाषेत कॉमेंट करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे, त्यांनी म्हंटल आहे की, ज्या पद्धतीने लोक इथे ट्विट करत आहेत त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे आपण कुणाबद्दल आणि का बोलतोय, आपल्याही घरात आई, मावशी, बहीण आत्या ह्या असतीलच ना! कमाल आहे खरंच.
ज्या पद्धतीने लोक इथे ट्विट करत आहेत त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे आपण कुणाबद्दल आणि का बोलतोय, आपल्याही घरात आई, मावशी, बहीण आत्या ह्या असतीलच ना! कमाल आहे खरंच. @supriya_sule @Awhadspeaks @MumbaiPolice @Dwalsepatil @CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— Atul Selukar अतुल सेलूकर (@atul22selukar) May 21, 2022
प्रशांत तांबे यांनी अमृता फडणवीस यांना रिट्विट करत म्हंटल आहे की, "कान्सला लोकांचे कान तृप्त करा नाहीतर कान्सचा अलिबाग कराल...."
कान्सला लोकांचे कान तृप्त करा नाहीतर कान्सचा अलिबाग कराल....
— PRASHANT S TAMBE (@PRASHANTSTAMBE1) May 21, 2022
तर अशाप्रकारे अमृता फडणवीस यांनी त्यांचा एक फोटो ट्विट केला व त्या ट्विट वर अशा अनेक कॉमेंट्स येत आहेत. खरंतर लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार नक्की आहे, पण व्यक्त होत असताना ते सभ्य भाषेत असावे इतकं तरी भान हवं ना? कारण आपण प्रत्येक वेळी बघतो की, अमृता फडणवीस यांनी काहीही ट्विट केलं की हे नेटकरी लगेच त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये तुटून पडतात. त्यांना नेहमीच ट्रोल केलं जातं. आता त्यांच्यावरती टीकाटिपणी करणं हे ठीक आहे. पण हे करत असताना आपली भाषा सभ्य चांगली असायला हवी इतकचं.. बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..