''गुवाहाटी ट्रिपची वसुली..'' राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..

Update: 2022-07-11 07:20 GMT

 सध्याच्या होणाऱ्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काही दिवसांपूर्वी घरगुती गॅसच्या दरात केंद्र सरकारे ने 50 रुपयाने वाढ केली तर विजेचा बिलाचा शॉक 100 युनिटने सर्वसामान्य जनतेला देण्यात आला आहे. तर हे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. केंद्र सरकार 5%gst खाद्य पदार्थांवर लावले आहेत म्हणू राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरून याचा निषेध केला आहे.

राज्यात हे नवीन सरकार सत्तेवर येतच विज बिल दरात, खाद्यपदार्थ आणि गॅस ची दर वाढ झाली आहे. मात्र या वाढी मुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आज पुण्यात लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व येथे याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप विरोधात जोरदार निदर्शना देण्यात आल्या.महागाई,बेरोजगारी,आणि गरिबी ही मोदींची लाडकी अश्या, गुवाहाटी त्रिपचा खर्च आशा प्रकारचे फलक हातात घेऊन निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरतला आणि गृहाटीला जाऊन स्थापन केलेलं सरकार आणि याच खर्च वसुली सर्व सामान्य जनते मधून करण्यसाठी विजेच्या माध्यमातून शॉक देण्यात आला आहे त्याचसोबत 75 वर्षच्या इतिहासात हे पाहिलं सरकार आहे ज्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अण्णावर टॅक्स लावला आहे. आणि गॅस च्या दरात 50 रुपयाने वाढ केली आहे. सर्वांच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आंदोलन करण्यात आले.

Tags:    

Similar News